आठवणी काही जपून ठेवलेल्या, काही आपोआप स्मरणात राहिलेल्या, काही मनाला स्पर्श करून गेलेल्या, काही हसणार्या, तर काही दुखावणार्या.......... काही गवसल्या नंतर काही हरवल्याची जाणीव करून देशाच्या , आशा या आठवणी. ... मित्रांनो, म्हणूनच तुमच्या सोबत जगलेल्या काही ठळक / धुसर आठवणींचा कोलाज मांडावा असं वाटलं..... बाजारे शाळा - वर्ग 4थी ब 4 थी ब चा वर्ग शेवटून दुसरा अंधारात होता, 4 थी अ चा मात्र अगदी पर्यात होता. त्या वर्गाकडे जायची त्यावेळी माझी कधी हिंमतच होत नव्हती.(अ तुकडी मधिल गोर्यां गोमट्या चेहर् यांची भितीच कारणीभूत असेल बहुधा ) बाजारे शाळेनंतर मुधोजी हायस्कूल ला भरती झाली. आमची रवानगी 5 वी अ मध्ये झाली. तो पहिला दिवस अजूनही थोडाफार आठवतो. सर्वांना तुकडी निहाय रांगेत उभे केले होते. पतंगे मॅडम आणि जावळे सर ( लिज्जत पापड ची जाहिरात लागली की सर अजूनही आठवुन जातात ) काहीतरी instructions देत होते. वर्गात प्रवेश केला. ....... ( सर्वात safe जागा म्हणजे मधल्या रांगेतील बाक, फार पुढे ही नाही आणि फार मागे पण नाही ) गणिताला पारशी मॅडम , इंग्रजी / विज्ञाना ला जोशी मॅडम. ( 4 थी पर्यंत शेंडे बाई, बेडकीहाळ बाई , कदम बाई, या सार्यांना बाई असे संबोधत होतो, 5 वी नंतर शिक्षिकेला मॅडम म्हणायला सुरूवात केली असावी ) हळूहळू वर्ग मित्रांबरोबर मैत्री घट्ट व्हायला लागली. शिकवण्या पण जवळपास सर्वांच्या काही ठराविक ठिकाणी च होत्या. 5 वी ते 10 वी मुधोजीच्या खुप सार् या आठवणी अजूनही लक्षात आहेत. भोकरे सरांनी पाठ करून घेतलेले I-go/You-go , शेख सरांची गणित व विज्ञान शिकवण्याची पद्धत, चांदवडकर मॅडम ची करडी शिस्त, नेरकर - हळबे सरांची संगितावरची आस्था, मदने सरांचे फळ्यावरचे सुवाच्च अक्षर, उंडे सरांचा रूद्रावतार, NCC मधले दिवस, धुमाळ सुरांचे extra classes , R.K. Deshpande सरांचे ऐका हातात नैपकीन घेऊन पुस्तक सावरणे, P.T. च्या तासाला केशरी रंगाच्या हवा नसलेल्या फुटबॉल मागे धावणे, विमानतळावर, चिटुं, देवदत्त, वादे, राठोड, किरण जाधव, शिवा, प्रित्या, योगेश निकम, सागर निंबाळकर या सर्वांबरोबर खेळलेल्या cricket matches, काही घराच्या खिडक्यांच्या फोडलेल्या काचा......
10 वी ला बर्वे सरांचा class ( सर फार शिस्तीचे, इतके की त्यांचा दुधवाला सुद्धा घड्याळाचा काटा चुकवत नसे.) आणि खुप सारे लाल शेरे असलेली माझी वही.
पुढे 11 वी 12 वी ला Y.C.J.C. ला admission, पण सालं तिथे करमतच नव्हतं, सर्व मित्र मुधोजीला च होते, classes एकच असल्यामुळे अंतर वाढले नाही.......
शेख सरांची energy, त्याचं dedication, चष्मा खाली घेऊन बघणे, केसकर सरांची physics शिकवण्याची हातोटी, शिंदे सरांनी maths साठी करून घेतलेली मेहनत.. बोर्डाच्या परिक्षा ( अदिती कुलकर्णी board exam ला पुढच्या बाकावर असायची - एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ ) नंतरची खुप मोठी सुट्टी, results चे आलेले tension ........सगळ अगदी व्यवस्थित आठवत. ... Results नंतर सगळे आपापल्या मार्गाला लागले..... पुलाखालुन बरच पाणी वाहुन गेलं होतं..... आणि अचानक उजाडला 26 जुलै चा दिवस.....
अशा बर्याचशा आठवणी मनात ठाण मां�डुन बसलेल्या आहेत . ...
जाता जाता कुठेतरी वाचलेला एक शेर
"किनारो पर सागर के खजाने नही आते |
फिर जिवन में दोस्त पुराने नही आते |
जि लो इन पलों को हसके जनाब फिर लौटकर दोस्ती के जमाने नही आते | " P.K.