Labels

Friend (11) mudhoji (11) phaltan (11) reunion (11) school (11)

Friday, July 31, 2015

MHS किस्सा - 5 : मित्राचे पत्र - पत्रात मित्र

तुम्हाला आठवते आहे का - तुम्हाला शेवटचा email किंवा पत्र कधी आले होते ?
नाही आठवत ना पण मलाही नाही. शाळेत पत्रालेखन केले पण त्यानंतर नाही.

आता पत्रे येतात ती… Bank, Insurance, किंवा कुठल्यातरी company ची।
       पण आपल्यांची पत्रे कशी असतात ते विसरलोच. आधी email किंवा SMS तरी पाठवायचे एकमेकांना पण आता तेही नाही.

आता याच गेट-टु मुळे मला एक पत्र आले बघातर कुणाचे आहे ते…


* ता. क. : आज मला नाही वाटत की पत्रात कुठे जागा मिळेल कंसातून डोकवायला, बघतो प्रयत्न करून *

प्रिय अभिजीत,

माझ्याकडे मराठी font नाही आणी मला इतक्या fast मराठीतुन type करताही येत नाही. 
So please consider it.
तुला एक किस्सा सांगायचा आहे - आपल्या गेत्टू विषयी.


तारीख 28/05/15 रात्री 9.45 ची.मी पुण्यावरून फलटणला जात होतो, गाडी चालवतच होतो आणी तेवढ्यात फोन वाजला.

बघतोतर Number निलेशचा. 
(निलेश भोईटे : या व्यक्तिमत्व बद्दल सांगायचे तर group वर आणि सामोरुन सुद्धा कमी बोलणारा, याची खूण म्हणजे मधूनच स्मितहास्य देणारा)

आमचे संभाषण  झाले :
मी: - बोल अण्णा !!
निलेश: - तुझा फोन का बंद आहे दोन दिवसापासून ? 
(hi -hello ची भानगड मैत्रीत सापडणे कठीणच वाटते)
मी: - मग आपण कशावर बोलतोय ? 
(आता याची कुठली रास म्हणायची काय माहित ? बिचारा पलीकडून प्रश्न विचारतोय आणि उत्तर न देता - उलटा प्रश्न विचारला. )
निलेश: - तस नाही - WhatsApp  बंद आहे का ? उत्तर कोण देणारबे!
मी: - लग्नात व्यस्त होतो त्यामुळे फक्त बद ठेवला होता.  स्मार्टफोनच्या  battery ची बोंबच आहेना बाबा। काही विशेष? बोल की…

निलेश: - अरे  योगेश ने Group बनवला आहे वर्गातल्या मित्र-मैत्रीणांचा WhatsApp वर, तुलाही Add केले आहे त्याने. 
(इथे निलेश म्हणा किंवा याने म्हणा; मला नाही  वाटत एवढे स्पष्ट आणि पूर्ण नाव घेतले असेल योगेश चे)
मी: -. बघतो घरी जाऊन -रस्त्यात आहे…. 

पुढचे बोलणार तेवढ्यात फोनच्या battery ने दगा दिला :(
आता घरी जाई पर्यंत काही कळणार नव्हते मला.

घरी गेल्यावर पहिला phone charging ला लावला आणि fresh होऊन जेवायला बसताना net on केला. 
(आता इथुनपुढे ह्याची मंडळी जोश मध्ये आल्याशिवाय राहणार नव्हती - जेवा कि निवांत झाले चालू फोन वरती. असा पक्का काहीतरी dialogue पडला असणार

आता mobile चे जेवण (charging) झाल्यामुळे तोपण जोमात आला होता, पहिले एक - दोन आवाज आले व्यवस्थित पण नंतर अर्धी ringtone वाजून नुसती light दिसत होती, बघतोय तर १२७८ messages.
(मला वाटतंय थापा टाकतोय, आत त्याच्या फोनची history कोण check करणार आहे)

बायको म्हणाली घरातल्या सगळ्यांचे messages तुमच्या mobile वर divert करून घेतले का?
इतके messages आणि नवीन group बद्दल उत्सुकता यामुळे रात्री काही झोप नाही लागली मला. 
मग सगळी रात्र messages वाचण्यात आणि ज्यांचे number माझ्याकडे नव्हते त्यांचे profile photo बघुन contact save करण्यात गेली. आता अजुन असे बरेचजण असे होते ज्यांची ओळख पटली नव्हती.

सकाळी कुणाचे message नव्हते मला वाटले नवीन group असल्यामुळे आता तिसऱ्या दिवशी पुर उतरला असेल. आणि आलाना राव तेवढ्यात good morning चा message. 
(पहिले तर याला घाबरल्यासारखे झाले असेल डोक्यात विचार येताच mobile मध्ये message आलाना)
 मी good morning चा message टाकुन reply केला आणि झाली पुन्हा messages ला सुरवात. 
पहिला mobile charging ला लावला.
(याला म्हणतात हात दाखवुन अवलक्षण - मलातर आता हसून हसून डोळ्यात पाणी आले बाबा या किस्स्याने)

त्यानंतर योगेशचा phone आला - कुठे आहे म्हणल्यावर ? 
नेहमीचे बेकारीवर आहे असे सांगितलं मग येतो म्हणाला निवांत बोलायला संद्याकाळी. 
(आता मला सांगा नवीन group त्यातुन एवढे messages आणि योगेश चा phone…. तुम्हाला तरी खर वाटते आहे का की हे संभाषण बिना BIP च्या पूर्ण झाले असेल)

संद्याकाळी योगेश आल्यावर सगळ्या गोष्टी clear झाल्या. 
आपल्या शाळेच्या group चा गेत्टू करायचा म्हणत होता.
मी लगेच होकार दिला - का-कुठे-कधी असले प्रश्न विचार मनात आलाच नाही. कारण इतक्या वर्षांनी आपण कुणा कुणाला भेटणार त्याचा विचार डोक्यात येत होता. 
शाळेच्या जवळ असल्यामुळे बरेचजण यायचे लहान असताना आणि तशीपण आपली जागा गावाच्यामाध्येच कुणीनाकुणी भेटत असतेच किंवा दिसते. 
(आता इथे भेटला आम्हाला बिर्याणी शिजवणार - एकट्याने थोडी बनते बिर्याणी चांगली - आणि एकटी खाण्यात पण मज्जा नाही, हा आता पुढे जाऊन बनला फलटण चा monitor)

आणि आता regular chatting सुरु झाली WhatsApp वर आणि नवीन ओळखी होत गेल्या. एके दिवशी ठराव मान्य झाला - २६ जुलै ला शिक्का मारला. (आणि एकमतानी विजयी झाले - शक्यच नव्हते ७० लोक म्हंटल्यावर)

पण शेवटी २६ जुलैला तुम्हाच्याशी सामोरासामोर भेट झाली. 
मला यायला थोडा उशीरच झाला पण तुमच्या सर्वांचे degree आणि job details सांगताना आलो होतो. पण सगळे एकूण चांगले वाटले. 

सलीम त्यावेळेस कुठल्यातरी वर्षाचे calculations सांगत होता.  :P 

उशिरा आल्यामुळे माझा intro राहिलाच, तशी त्याची गरज आहे का?
नाव : साईप्रसाद फुले
शिक्षण : १० पर्यंत - मुधोजी; ११-१२ - Y.C.; Diploma in Bakery & Confectionery from Maharashtra Institute of Hotel Management & Catering Technology, Pune. 

ज्यांच्याशी शाळेत कधी बोललो नाही त्यांच्याशी गप्पा रंगल्या - सगळ्यांनी आपुलकीने चौकशी केली…. 
खरच खूपच छान गेले ४-५ तास रोजच्यापेक्षा कितीतरी वेगळे… 
मस्त। एकदम refreshing वाटले. 
खरच खूप सुंदर झाला प्रोग्राम आपल्या गेट-टु चा… !

जे सुचले ते लिहून पाठवतोय हवे तेव्हा तक blog वर. :)

- साई. 




छान वाटलेना बऱ्याच दिवसांनी email किंवा पत्र वाचून. 
वाटणारच… आपल्या मित्राचे आहेना. 

असेच भेटत राहा। पत्र पाठवत राहा …. 

अरे पुन्हा विसरलो… आलाय काय प्रश्नांचे उत्तर… 


……………………………… वाचाल तर वाचाल …… काय पुढील ब्लॉग ;)



                                                                           >>>> MHS किस्सा - 7: Coming सून

Thursday, July 30, 2015

MHS किस्सा - 4 : गुरु महिमा

Hmmmm........
तुम्ही माझ्यासंगे office पर्यंत आलात, पुन्हा सोडायची जवाबदारी माझी!
सलिम बरोबर चक्कर मारलीत, त्याचे म्हणणे होते :
"अब्बांचे फटके तर खायचोच घरी, पण school-ground वर खो-खोसाठी खलाटे सरांचेही फटके खायचो. पण याचमुळे वर्षातुन एकदाका होईना सगळे students व शिक्षक आमच्यासाठी टाळ्या वाजवायचे, कारण zonal व district ला आम्ही जिंकुन यायचो. हे तर झालेच पण वर्गातसुध्दा home work complete नसल्यामुळे तिथेही... फटकेच. अशाप्रकारे घरी, शाळेत व ground वर त्रिवार फटके खात आयुष्य फाटके न होता, engineer झालो. अब्बा व teachers ना प्रणाम व आभार आपल्याला track वर ठेवल्याबद्दल!!!"
(अरे या सल्या चे मला एक कळत नाही बांगलादेशी आहेकी काय? नुसता खा खा खातोय आणि तेपण काय तर मार, असुदेत पण तो आपला मित्र आहेना भावा)
मी तर पोहचलो, येरवडा-रेंज हिल्स-university-चर्तुश्रींगी-Symbi करत कमला नेहरु पार्क पर्यंत.
इथे मस्त मंदिर आहे - श्रीदत्त महाराजांचे. सुंदर      अक्षरात लिहीले आहे:
गुरूब्रम्हा गुरुविष्णु:
गुरूदेवो महेश्वरा
गुरु साक्षात परब्रम्ह:
तस्मैश्री गुरूवे नमः।।
सर्वांनाच गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा .
आता तुम्हाला इकडेच drop करुन मी निघतो, रस्ता लहान आहे मागचे गाडीवाले Horn वाजवत आहेत.
भिउ नकोस मी "कंसात" आहे, चला चालुद्यात तुमचे.
आज गुरूपौर्णिमेचा मुहुर्त म्हंटल्यावर तुम्हाला सर्व गुरुदनांची आठवण करुन द्यायला हवी, पण करुन कोण देणार मी तर निघालोय, तुम्ही स्वतःच ओळख करुन त्या व्यक्तीशी.
नमस्कार,
मी होते गेटटुला थोडीशी silent mode मध्ये. मला तुम्ही "भांडकुदळ" म्हणुन ओळखायचा.(आता ही सु की कु प्रसिध्दी तुम्हाला जास्त माहीत) हा बदल तुम्ही स्वतःच ओळखलात ना?
काय ओळखलेत का? मी गौरी फुटाणे। 
(पावसाचा माैसम आहे मस्त मसालेवाले शेंगदाणे घेतल गाड्यावरुन, अरेच्चा इथे फुटाणे पण आहेत. मराठी भाषाही आपली वळवाल तशी... :D मी वळतो.)
काल सलिम बरोबर चक्कर मारलीत तेव्हा शिक्षकांच्या आठवणी ताज्या झाल्या.
आता सुरुवात कुणापासुन करायची हा प्रश्न? विषयाला धरुन बोललेकी सर्व प्रश्न सुटतात.
गणित विषयाने सुरुवात करुयात आपण.(मी सांगितलेना भिउ नकोस मी कंसात आहे. इथे कुठलेही सर तुम्हाला गणित सोडवायला देणार नाहीत याची guarantee माझी. प्लिज continue...) तर मी बहुतेक सर्व सरांना का खटकायचे तेच कळायचे नाही.
मग ते वादे सर असोत की अडसुळ सर किंवा अगदी उंडे सर सर्वांची बोलणी खायचे. (बोंबला सल्या खायचा मार आणी ही खाते बोलणी,देवा कसली पोरं भरली आहेत या शाळेत) अडसुळ सर मला व अनुराधा तावरेला उभे करुन भरपुर झापायचे, सुरुवात ठरलेली- "तुम्ही स्वतःला फार शहाणे समजता.... इ.". Sorry नितिन एक गोष्ट सांगाविशी वाटते- अडसुळ सर आम्हालाना 'राज कपुर' सारखे दिसायचे.
दहावी-अ च्या वर्गाला होती gallary, अगदी stage च्या शेजारील LAB च्या वरचा वर्ग. इथेच Lunch break मधील डब्बा संपवुन गँलरीत आम्ही उभ्या असताना कुठल्यातरी विनोदावरुन आम्ही हसत होतो आणी तेवढ्यात शाळेच्या गेटमधुन आत येत असताना उंडे सरांनी आम्हाला बघीतले. (आता इथे आपण इतिहास काळाची गोष्ट करत असलो तरी कुठल्या ज्योतीषाची गरज नाही काय झाले असेल ते सांगायला) गणिताच्या तासाला आम्हाला उभे करुन ५-१० दहा मिनीटे तोंड सुख घेतले आणी आमचे oppositionवाले जे benchवर बसलेले होते त्यांची
मनातल्या मनात खो खो हसुन काय अवस्था झाली असेल ते तुम्हालाच ठाऊक. पुढील १-२ आठवडे तरी त्या शापीत gallery चा उंबरा ओलांडणे होणार नाही हे नक्की.
आता गणिताचाच विषय चालु आहे तर सांगते मला प्रकाश शिंदे व भोईटे सरांनी फार मदत केली. प्रत्येक प्रसंगी भरपुर मदत मिळाली, अनंत उपकार आहेत माझ्यावरती.
एक किस्सा - शिंदे सरांच्या tuition चा. एकेदा संध्याकाळी भरपुर जोराचा पाऊस होता; मी, गायत्री आणी चव्हाण आम्ही तिघीच क्लासला बाकी कुठल्याच मुली आल्या नव्हत्या फक्त मुलेच. त्यात पुन्हा light गेली, आम्हाला फार भिती वाटली. पण कुणी आमहाला त्रास दिला नाही की चिडवलेसुद्धा नाही.(आता माझी सटकली - फलटणची पोर म्हणजे काय टुक्कार category वाटली काय? दंगा-मस्ती करणारी category आम्हा मित्रांची पण असले विचार म्हणजे जास्तचं होतयना राव! त्या दिवशी बोलुन दाखविले असते तर आकाश व क्लासच्या बाहेर अशा विजा चमकल्याकी जन्मात लक्षात राहीली असती पावसाळी संध्याकाळची tuition ची तुमची attendance. प्लिज continue...)
काही जणांनी भुगोल हा विषय घेतला होता ११-१२ वीला. त्याचे वर्ग चालायचे drawing class मध्ये, निंबाळकर madamचे. आता या वर्गाला २ दरवाजे आणी मजल्याला जिने दोन. एका जिन्यातुन बाई वरती येऊ लागल्याकी दुसर्या जिन्यातुन विद्यार्थी पसार... आठवते का? (होना भुगोलाचे lecture attend करायचे म्हंटलेकी जीव भगुल्यात पडायचा)
मराठी विषय कसा विसरेन मी - आपली बोली भाषा म्हणुन नव्हे तर चांदवडकर बाई व शाळेचा uniform-साडी(पोरांनो मराठीचा विषय चालु आहे तिकडे लक्ष द्या बाकीचे विषय नकोत! मला नमुद करावेसे वाटतय मुलींनी सांगीतल्या प्रमाणे त्यावेळेस मी शेळपटच होतो. धन्यवाद मी वाचलो, प्लिज continue...) मराठीच्या लेक्चर आहे म्हंटलकी आमची त्रेधातिरपीट व्हायची.
आता धावती ओळख Physics च्या class ला. "Rigid body... Rigid body... Substance..." ऐकुन जाम bore व्हायचे पण बोराटे सरांच्या चेहरा व शिकवण्याची चिकाटी बघुन विषयात कधी कमी marks पडतील असे वाटले नाही.(Hats off for teaching us)
सगळ्या teachers ची list व आठवणी भरपुर आहे पण blog भरपुर मोठा होईल व तुम्ही पळाल, म्हणुन पुन्हा कधीतरी.
Last but not least ज्यांच्यामुळे हा blog पुर्ण होणार नाही ते आदरणीय शेवडे सर. घरच्यांची ओळख असल्यामुळे मला सरांचा बराच support मिळाला. त्यांनी तर मी दहावीला पास झाल्याचा result सांगुन स्वतःच पेढे दिले होते.
हे दिवस कसे फुलपाखरासारखे उडुन गेले ते कळलेपण नाहीत. फुलपाखराला पकडायचा प्रयत्न केलातर हाताला लागतो तो त्याचा रंगेबेरंगी रंग.... या आठवणींचा.
अजुनही बरेच काही आहे तुम्हा सर्वांनबद्दल सांगायला पण पुस्तक बनुन जाईल या सगळ्यांच्या आठवणींचा.
योगेश तर एक best Admin आहे तु या सर्वांचे bonding कायम ठेवायला मदत करशीलच ही अपेक्षा।
आता झालीका सर्व शाळेची व शिक्षकांची भेट.
गाैरीला special thanks मला सुट्टी दिल्याबद्दल की आज blog कुणाचा व काय लिहावे याच्याबद्दल.
पण अजुनपण मला एक गोष्ट खटकत आहे - तुम्हाला अजुन कसे नाही कळाले ती पृथ्वीच्या गोलाशी comparison असलेली व विद्यार्थी दशेत Flat पोट असलेली व्यक्ती कोण???
सांगतो पुढच्या किस्स्यात....!

                                                                                    >>>> MHS किस्सा -५

Wednesday, July 29, 2015

MHS किस्सा - ३ : Hunter के Punter

आज मागिल पानावरुन पुन्हा प्रवास चालु ठेवताना, आमच्या गेटटुसाठी Dose देणार्या Dr. Madam चा सल्ला - "एकवेळ रात्री उशीर झाला तरी चालेल पण काम फत्ते करुनच झोपा." अबब असे डॉक्टरीचे सल्ले देणारे इस्पितळ उघडले तर कल्याण आहे patientचे.
असोत मीपण typical patient सारखे दोन्ही कानांचा वापर सोयीस्कर ठरविला. या ह्याच डॉ. Madam, किस्सा क्र. १ मधील उत्तर, एव्हाना ओळख झालीच असेल - डॉ. हर्षदा बुरुंगले-पाटील.
असोत, कामगिरी पुर्ण करायचीना तर चला माझ्यासोबतच! वेळ सकाळची - office ला जायची(डॉक्टरांचा सल्ला संध्याकाळचा पण मी सकाळपासुन सुरु करताे). आपल्या सारखा मीपण खोडा confuse होतो, पुढील किस्सा कुणाचा? माझीपण हालत भर चाैकातुन रस्ता cross करताना पुढील-मागील दोन्ही signal सुटल्यामुळे  जशी होईलना अगदी तशी होती. मग काय अशावेळेला काय करतो? १.  Signal बंद होण्यासाठी वाट पहाणे किंवा २. कुठलीतरी एखादी दिशा धरुन हात वर करुन चालत राहणे. मला घाई नव्हतीच - एव्हाना मी राजाराम पुलाशी पोहचलो. गर्दीतुन सटकन Left turn मारुन पुलावर पोहचलो. नदीवरुन जाताना थंड वारे गाडीत प्रवेश करुन विचारांची दिशाच बदलुन टाकली. समोर होती सायकलवरुन tuition जाणारी मित्रांची रांग.
मग मी थोडापुढे जात flashback मध्ये गेलो. शाळेत असताना tuition तर आपणपण भरपुर केल्यात. Seat belt लावुन घ्या, Pen drive लावुन 'बाहुबली' चे songs चालु केलेत. आधी दररोज एकटा प्रवास करायचो आता "जब मील बैठे ३ यार... १. आप, २. मैं और ३. पुरानी यादे  in my car". या movieची गाणी धमाल.. थोडीशी संस्कृत मधली. आळतेकर सरांच्या tuition ला असतो तर सरांनी अर्थ व्यवस्थित समजावुन सांगीतला असता, पण ते आता होणे नाही :(
आज इच्छा आहे tuition ला जायची पण नाही जावु शकणार... का?
प्रश्न काय विचारताय office ला जायचे नाही का?
नळस्टॉप आलस signal मोठा... आणखी शिकवण्यांची उजळणी कराचा विचार? करुयात की तुम्हाला कुठे गाडी चालवायची आहे? आता मी खुश्कीच्या मार्गाने Symbi- चत्तुश्रींगी- university-रेंज हिल्स करत जाणार... तुम्हाला routeमोठा होत आहे काय करणार आजचे प्रमुख पाहुणे भेटले नाहीत :(
चलो आणखी शिकवण्यांची उजळणी!
Randomlyआठवत होते... शिंदे सर(गालांवरती नेहमीच स्मित हास्य झळकत ठेवणारे), भोईटे सर(क्लासेस पासुन जिंतीपर्यंत भरपुर Cars chi रांग लावायचे), शेख सर(चष्मा कधी नाकावरती चढवुन रागावणारे तर कधी तोच चष्मा थोडीसा खाली घेत मिश्कील हसणारे), बर्वे सर(tuition साठी प्रवेश परिक्षा घेणारे), & भोकरे सर(वेळ प्रसंगी उशीरा आल्यास आपल्या दणकट पांढर्या खडुने माखलेल्या हाताने रट्टा देणारे).
होळकर पुलावरुन पोहचलोय येरवड्याला... आता office येणार :|
कुठे ? येरवडा jail शेजारी IT कामगार भरपुर येतात तिकडेच आहे.
तसे संजुबाबांना company द्यायाला सल्लु मियांपण येणार होते ऐन वेळेला कलटी मारली(same तशीच पैसे न भरता गेटटुला यायचे पक्के सांगुन उपस्थित न झालेल्यांसारखे, ज्याची त्याची वैयक्तिक कारणे असु शकतील, उगीच घोटळा नको विचारांचा).
बरं आता एक गोष्ट कॉमन झालीना
१. जेलमध्ये न आलेले - सल्लु मियां।
२. भोकरे सरांच्या शेजारी - सल्लु मियां।
३. आत्ताच WhatsApp वर comments कशे टाकणार विचारणारा - सल्लु मियां।
मी पोहचलो officeला, (तुमच्याकडे  access card नाही) तुम्ही जावा सल्लु मियां उर्फ सलिम बरोबर फिरायला...... हा हा हा।
इथुन पुढे माझी presenty कंसातच.
सलिम आत्तार उर्फ सल्लु मियां तसा मी बेताचाच विद्यार्थी (हुशार होताना राव पण करणार काय अंगात अवली किडे फार :P )
रहायला शाळेच्या जवळ पण कामे नेहमी शाळेतुन पळायची. माझ्या घराशेजारुन जाताना हळुच घराच्या मागच्या खिडकीतुन "सल्या, चलरे" म्हणणारे मित्र.(अर्थात माझीही हाक असायचीच)
शिकवणी शेजारी असुनपण कधी कधी घरी कपड्यांवरचे हातासे ठसे बघुन शेजारी शिकवणीला जाताना उशीर का झाला म्हणुन पुन्हा फटके खाउन कपडे स्वच्छ झालेला मी सलिम(मला वाटते मोदींनी याला स्वच्छ भारताचा Brand अंबेसिटार घोषित करण्यास काहीच हरकत नाही, आणि एक अतिमहत्वाचा मुद्दा सगळे detergent powder, soap वाले याच्यावरती त्यांचा कपडे साफ करण्याचा business डुबविल्याबद्दल दावा करतील की काय ही भीती आहेहो!)
मेन मुद्दयाकडे वळुयात.....
मला सगळ्यात आधी WhatsApp group form झाल्याची बातमी मिळाली ती चिन्याकडुन(नाव: सचिन, पण हा आपल्या गावात कसे हा नेहमी प्रश्न पडलेला.. क्रमश: तुमची ओळख होईलच)
आता WhatsApp group म्हंटल्यावर भरपुर message forwarding हा एक समज। पण आख्या जन्मात जेवढे पेपरमध्ये answers लिहीले नसतील तेवढे टाईप करावे लागते या ग्रुपमध्ये. (मला वाटते online पेक्षा कागदावरती लिहुन मेसेजींग केले असते तर सुंदर अक्षर असणारे विद्यार्थी झालो असतो अन शाळेत हाच विषय add करण्यास permission मागितली असती)
आता ओघानेच गेटटुचा मुद्दाही कळाला, पण येवढ्या वर्षांनी कसे काय? कुठे? असे प्रश्न आले. उत्तरं कुठे मिळणार तर शाळेजवळील renovation झालेल्या बेकरी मध्ये (गावातील अर्ध्या पालकांच्या खिशातील ₹-पैसे इकडे गल्यात जमा झालेले असतात).
साईनाथ बेकरी हा गावात राहण्यांचा famous कट्टा, इथुन news पक्की असल्याची कळताच आनंद झाला इतक्या वर्षांनी भेटणार सगळे. मी येणार असल्याचे confirm केले. माझा already plan होता तेव्हाच सोलापुरला जाण्याचा पण ते काम postpone होऊ शकत असल्याने माझा येण्याचा अडसर दुर झाला.
(साईच्या कृपेने गेटटुची कथा ऐकुन आणि शालेय मित्र-मैत्रीणींना भेटण्याची ईच्छा असलेल्या सलिमला योग्यते मार्गदर्शन दिले)
एक मात्र गोष्ट चांगली झाली माझ्यासोबत अब्बांनी फटके दिले पण त्यामुळेच माझी गाडी track वर राहीली आणी तुमच्याशी भेटु पण शकलो.
Thank you अब्बा.
गेटटु चा माझा अनुभव सांगायचे झाल्यास येवढा Freeness मला न कॉलेजवाल्या गेटटुला जाणवला न office partyला. इथली energyच वेगळी होती.
आणखी एक गोष्ट कळकळीनी सांगाविशी वाटते- योगेश माझ्यासारखाच बेताचा विद्यार्थी पण चिकाटी व जिद्दीने जे त्याने achieve केले त्यासाठी hats off to him.
योगेश ला माझ्यातर्फे UPSC च्या साठी best luck!
आणि गेटटु arrange केल्याबद्दल धन्यवाद!!!
काय झाली चक्कर मारुन सल्या उर्फ सल्लु मियां उर्फ सलिम सोबत???
अरे काय हे किती messages WhatsApp वर...
शिवाजीच्या मोबाईलची screen फोडुन येतील messages बाहेर.
पण किस्सा क्र. २ च्या प्रश्नाचे अजुनपण उत्तर नाही मिळाले का?
उत्तरं पाहीजे वाट पहा.... पुढच्या किस्स्यात भेटण्याची.         
                                                                                      >>>> MHS किस्सा - 4 :

Tuesday, July 28, 2015

MHS किस्सा - 2: Risky Decisions

चला या पानावरुन त्या पानावर करताना थोडा वेळ थोडासा विचार केल्यास काही हरकत नाही, इथे तुमच्या शाळेच्या कुठल्याही कडक teacher नाहीत. मला कळाले कुठल्या madam चे नाव hit झाले असणार. जर खरेच त्याच madam असत्या तर? पान पलटणे योग्य निर्णय बरोबर अन्यथा........ Risky decision! Correct?

आज बघु कुणी आणि कुठले Risky decision घेतले...इथुन पुढील त्याच व्यक्ती बरोबर प्रवासाला लागा मी मात्र कंसातील खिडकीतुन डोकवत राहीन :)

गाडीच्या passenger seat वर बसुन सगळेच bore होत असावेत कदाचित तशीच मीही होते :-) 
एके दिवशी नेहमीप्रमाणे office ला जात असताना mobile वर टाईमपास करत होते (office मध्येपण असेच करत असणार) आणि Facebookच्या messenger  वर एक message आला - "Palle...!!!"
आई-बाबांनी प्रेमाने ठेवलेले नाव फक्त शाळा-कॉलेज मधले मित्र मैत्रिणीच बदलू शकतात ;-) याची खात्री सर्वांनाच असेल.
  "WhatsApp वर आहेस का तुझा number दे." तिथून झाली गप्पांची अन् फिदीफिदीची सुरुवात...आमचा मस्तपैकी मुलींचा WhatsApp group जमला....वाढदिवस अन् anniversary ला शुभेच्छांचा पाउस पडू लागला.
आणि अशातच एके दिवशी हर्षदाचा message आला - "मुला-मुलींचा एकत्र group होत आहे join होणार का?"
(योगेशने शिजु घातलेल्या बिर्यानीची पहीली 'बिनधास्त' ऑर्डर हिचीच होती, पुढे कळेल का ते?)
 थोडं वेगळं वाटलं कारण आपण शाळेत असताना कधीही बोललो नाही मग अश्या लोकांशी काय अन् कसं बोलायचे...पण मग विचार केला तेव्हा न बोलण्यामागे बरीच कारणे  होती...आता सगळेच mature असतील ;-)
(वरील उतारा अलिखीत करारा विषयी हे नकिकी पण maturity चे तुमचे तुम्हीच ठरवा :P )
मग काय झाले join group वर....एका weekend ला Get-Together चे discussion सुरू झालं मनात विचार आला कितपत होईल शंकाच आहे! पण झालं तर काय हरकत आहे जायला...मग तयारी दाखवली.
 अन् खरच योगेश आणि team ने मस्तपैकी Get-together arrange केला. 

(We are friends, correct? एकाच शाळेचे विद्यार्थी, अहह जास्त विचार केल्यास पुढील विचार तुम्हीसुध्धा केले असणार. जर हे खरे असेल तर शेवटी Comments चा मार्ग विचार प्रकट करा. तोपर्यंत पल्लेचे विचार बघु....... )

Get together ला येताना वाटलं होतं आपण bore झालाे तर लवकर कलटी मारायची.
आपण तर खूप कमी जनांना आेळखतो, पण वेळ कसा गेला कळलंच नाही.(आई-शप्पथ बोलणारच होती बहुतेक पण टाळले असणार, कारण आपण नाही आपली पोरबाळ शाळेत जातात)
खुप जण भेटले आणि कधीच ज्यांच्यांशी बोलले नाही अशा लोकांशीही न बोलणे झालेल्या लोकांशीही खुप जुनी ओळख असल्यासारखे वाटले.
Intro चालू असताना प्रत्येकजण वेगवेगळ्या field मध्ये successful आहे हे एेकुन मस्त वाटले...ज्यांचे आधीचे चेहरे आठवत होते त्यांच्यातले बदल पाहून जाणवलं की किती वर्ष उलटली आहेत ;-)

( Actually जरी काही गोष्टी थोड्याबहुत फरकाने बदलल्या होत्या..... १. डोक्यावरील शेतीचे प्रकार आणि २. Flat पोटाचे ढेरीत रुपांतरीत झालेले आकार 
तरीपण मने मात्र तिच शाळेतील निरागस विद्यार्थ्यांची.....आल्या आल्या आपल्या मित्र-मैत्रीणींना शोधणारी )

...जाताना लवकर कलटी मारायची या विचाराने गेलेल्या मला ४ कधी वाजले ते कळलंच नाही. त्या दिवशी घरी येताना एक वेगळं feeling होतं जे कदाचित शब्दात सांगू शकणार नाही, अजूनही Get-together चा hang over बाकी आहे असं वाटतंय...विवेकने spicy करून सांगितलेले किस्से आठवले की हसायला येतयं :-)
घरातल्यांना जेव्हा आठवणी सांगतेय तेव्हा खूप छान वाटतंय...आपल्या शिक्षणामुळे किंवा नोकरीमुळे आपण आपल्या घरापासून जरी लांब गेलो तरीही या WhatsApp and Facebook ने (याचे advantages & disadvantages हा एक वादग्रस्त मुद्दा आहे आणि त्यावर मी पामर काय बोलणार ;-) so तो वाद इथे नकोच) आपल्याला जवळ नककीच आणलय.
इथून पुढेही आपण असेच भेटत राहूयात आणि आपली मैत्री अशीच फुलून येवो.

....... काय कसा वाटला आपल्या पल्लवी ताईंचा प्रवास ?
एक गोष्ट वाखाणन्याजोगी होती, आठवलीका ??
तीने Risky decision घेतले आणि हो बोलली "आपल्या" गेटटु साठी... That's the spirit!!!
एक सुमडीतली गोष्ट सांगतो... पल्ले actually आमची गिनीपीक होती.. ती जर नाही म्हंटली असती तर आपण भेटु शकलो नसतो. धन्यवाद पल्लवी।

 ता. क. : या blog खरी मेहनत पल्लवीची बरं, आपण फक्त editor's cut.

बरं तुम्हाला आठवले पाहीजे, बहुतेक दहावीला धडा असावा... एक मुलगा लायब्ररीच्या गच्चीत अडकतो आणि खालुन चालणारी व प्रुथ्वीच्या गोलाशी पोटाची तुलना करणारी व्यक्ती पाहुन सुटका होण्यासाठी दयावया करतो.
आपल्या मित्र-मैत्रीणीं पैकी एकचजण वेगवेगळ्या काळात भुमिकेत सुट होतोय कोण तो???
मी नाही सांगणार तुम्ही आठवणींचा उजाळा देउन सांगा याचे उत्तर।


पुढील प्रवास सुरु होईपर्यंत वाट पहा उत्तराची ;)      >>>>MHS किस्सा - 3: Hunter ke Punter

MHS किस्सा - 1: Facebook Friend Request

As you know I started with describing my first interaction about getting in touch with my friend.
Now let's move to another*  impressive personality Aditi Kulkarni.
*Note: wherever someone says 'Another' it means first occuranace already specified. E.g. किस्सा 0 was about me.
Aditi, in school used to be less talkative (only close friends can describe it in better way) still always part of various groups.
OK... Let's hand over to her to continue.

विशेष सुचना: वाचकांना नम्र विनंती कंसातील शेरे हे फक्त काल्पनिक असले तरी सत्याशी जुळणी करु शकता :p

मी, Aditi Kulkarni, मुधोजीची विद्यार्थीनी. वरती सांगीतल्या प्रमाणे थोडी reserve category असेलही माझी,ते तुम्हीच ठरवा. आठवतय त्याप्रमाणे शाळेत मुला-मुलींमध्ये एक अलिखीत कमी (न) बोलण्याचे Agreement होते.
 Regular routine प्रमाणे Facebook check करताना एक friend request दिसली अगदीच unexpected होते माझ्यासाठी. इतकी वर्ष कुणाच्या(mostly boys) touch मध्ये नसताना एक friend request येते आणी ती पण एका मुलाजी. Can you guess who is the person, who sent me friend request? शिवाजी बंडगर.  I accepted the friend request(but obviously Facebook profile check केले असेल). मला जास्त conversation होइल अस expected नव्हते कारण friend rèquest तर भरपुर येतात पण पुढे जास्त काेणी touch मध्ये राहत नाही. तसे friend request accept करताना वेळ घेतला थोडा कारण शाळेच्या आठवणी ताज्या झाल्या(ता. क. एवढी ताजी झाली असेल पण एक कप चहा किंवा coffee घेतल्याशिवाय आमच्या शिवाजी friend request accept केली नसणार). शिवाजीला कुठुतरी कळाले होते मुली एकमेकींच्या contact मध्ये आहेत, त्याने सुचवले काही मुलेपण WhatsApp वरती group chat करतात तुम्हीसुध्धा join व्हाल काय. मला हो म्हणायला कीहीच हरकत नव्हती, कारण ग्रुपमध्ये add करायचा option जरी फक्त Admin कडे असले ग्रुप न आवडल्यास सोडण्याचा option आपल्याकडे असतो. विवेकने मात्र पुढे या WhatsApp च्या functionality चा मनसोक्त आनंद घेतला.

आता पुढे सांगायचे झालेतर कुठल्याच ग्रुपमध्ये मी Add झाले नव्हते to be specific no one has added me to any group. :( मला वाटले आणखी एक Facebook friend list मे Add हो गया. Life goes on म्हणुन व झालेले conversation विसरुन, मी पुन्हा routine life मध्ये मशगुल झाले.
पण मला याची कल्पनाच नव्हती की Blue Nile ची बिर्यानी शिजवायला पातेल भट्टीवर चढवले गेले आहे. अगदी अभिजीतने वरती सांगीतल्या प्रमाणे मलाही unknown number वरुन phone आला कुठल्यातरी credit card किंवा loan च्या offer चा असेल असा विचार आला आणि पटकन 'not interested' सांगुन मोबाईलची battery आणी वेळ दोन्ही वाचवायच्या बेतातच होते पण झाले काहीतरी वेगळेच संभाषण.
मीः हेलो
अनोळखी व्यक्ती: हेलो, आदिती का, मी योगेश निकम बोलतोय.
मी: ओके
योगेश: मी Actually मुधोजी हायस्कुल फलटणला होतो..
(शिवाजीच्या किस्स्याचे विस्मरण झालेली आदिती मनातल्या मनात donation साठी phone केलाकी काय)
मी याच्यासाठी फोन केलायकी आम्ही WhatsApp चा ग्रुप बनवलाय तुला add करु का? आणी आमचा असाही plan आहेकी आपल्या मुधोजी च्या मित्र-मैत्रीणींचा Get-together करायचा.
(WhatsApp वरती बरेच फॉरर्वडेड मेसेज वाचल्यामुळे हा डायलॉग चिटकवावासा वाटतोय : योगेश जोमात आदिती कोमात)
अशाप्रकारे pre-approved loan नव्हे तर WhatsApp group membership चा कॉल घेऊन मी ग्रुपला join झाले.
आता प्रश्न होता - गेटटु होतो की नाही?

काही दिवसानी तिसरी व्यक्ती जी डॉक्टरीच्या व्यवसायात असल्याने मला सारखे dosage देत राहीली गेटटुला येण्याचे. आत्ताच मी नाव सांगतनाही ती व्यक्ती कोण ते पण तुम्हा लोकांना guess करायला वाव आहे, काय अभिजीत बरोबरना?

To be continued.... कहानी अभी बाकी है दोस्तो।

Time for new Post ------------------------------------->>>> Next Page : MHS किस्सा - 2: Risky Decisions

Sunday, July 26, 2015

Reunion:2015 - Mudhoji High School, Phaltan

Starting with the photo, I, Abhijeet Rathod, student of class-A, would like to summarize the story/journey of this Get-together/Reunion.

It's been almost 15 years since I came out of the school gates and there was a very rare chance to meet my school friends. Unlike all my friends, I got busy with various phases coming to life but cannot forget old school days. Even while taking my son's admission to school in Pune, at home we do had discussions about my schooling and old memories. Hence such things continued to remind me my old school days and my school mates.

किस्सा: 0
On one usual day I got a phone call.. Number was unknown to me but the person who was talking to me seems to be a voice of familiar person. I fumbled, who is the person I am talking to? First line after "Hello" "काय अभ्या कसा आहेस?" Suddenly mind & brain stopped thinking about the work(I am hopefully doing that) and simply started thinking about the voice and who is the person and where we might have mate him... Must be someone close to me.
Finally all questions answered by second line - "अरे मी योग्या. योगेश निकम आपण मुधोजी होतो...फलटणला".(James Bondचा प्रभाव अजुनपण कमी नव्हता) My reply was simple & straight "Oh shit... एकच मिनीट" I moved to nearest meeting room to continue phone call and our conversation continued with lots of BIPS and finally resulted in commitment to meet each other for very nice cause. 


To be continued.... कहानी अभी बाकी है दोस्तो।

                                                                                                >>>   Visit Next Page किस्सा - 1