Labels

Friend (11) mudhoji (11) phaltan (11) reunion (11) school (11)

Wednesday, July 29, 2015

MHS किस्सा - ३ : Hunter के Punter

आज मागिल पानावरुन पुन्हा प्रवास चालु ठेवताना, आमच्या गेटटुसाठी Dose देणार्या Dr. Madam चा सल्ला - "एकवेळ रात्री उशीर झाला तरी चालेल पण काम फत्ते करुनच झोपा." अबब असे डॉक्टरीचे सल्ले देणारे इस्पितळ उघडले तर कल्याण आहे patientचे.
असोत मीपण typical patient सारखे दोन्ही कानांचा वापर सोयीस्कर ठरविला. या ह्याच डॉ. Madam, किस्सा क्र. १ मधील उत्तर, एव्हाना ओळख झालीच असेल - डॉ. हर्षदा बुरुंगले-पाटील.
असोत, कामगिरी पुर्ण करायचीना तर चला माझ्यासोबतच! वेळ सकाळची - office ला जायची(डॉक्टरांचा सल्ला संध्याकाळचा पण मी सकाळपासुन सुरु करताे). आपल्या सारखा मीपण खोडा confuse होतो, पुढील किस्सा कुणाचा? माझीपण हालत भर चाैकातुन रस्ता cross करताना पुढील-मागील दोन्ही signal सुटल्यामुळे  जशी होईलना अगदी तशी होती. मग काय अशावेळेला काय करतो? १.  Signal बंद होण्यासाठी वाट पहाणे किंवा २. कुठलीतरी एखादी दिशा धरुन हात वर करुन चालत राहणे. मला घाई नव्हतीच - एव्हाना मी राजाराम पुलाशी पोहचलो. गर्दीतुन सटकन Left turn मारुन पुलावर पोहचलो. नदीवरुन जाताना थंड वारे गाडीत प्रवेश करुन विचारांची दिशाच बदलुन टाकली. समोर होती सायकलवरुन tuition जाणारी मित्रांची रांग.
मग मी थोडापुढे जात flashback मध्ये गेलो. शाळेत असताना tuition तर आपणपण भरपुर केल्यात. Seat belt लावुन घ्या, Pen drive लावुन 'बाहुबली' चे songs चालु केलेत. आधी दररोज एकटा प्रवास करायचो आता "जब मील बैठे ३ यार... १. आप, २. मैं और ३. पुरानी यादे  in my car". या movieची गाणी धमाल.. थोडीशी संस्कृत मधली. आळतेकर सरांच्या tuition ला असतो तर सरांनी अर्थ व्यवस्थित समजावुन सांगीतला असता, पण ते आता होणे नाही :(
आज इच्छा आहे tuition ला जायची पण नाही जावु शकणार... का?
प्रश्न काय विचारताय office ला जायचे नाही का?
नळस्टॉप आलस signal मोठा... आणखी शिकवण्यांची उजळणी कराचा विचार? करुयात की तुम्हाला कुठे गाडी चालवायची आहे? आता मी खुश्कीच्या मार्गाने Symbi- चत्तुश्रींगी- university-रेंज हिल्स करत जाणार... तुम्हाला routeमोठा होत आहे काय करणार आजचे प्रमुख पाहुणे भेटले नाहीत :(
चलो आणखी शिकवण्यांची उजळणी!
Randomlyआठवत होते... शिंदे सर(गालांवरती नेहमीच स्मित हास्य झळकत ठेवणारे), भोईटे सर(क्लासेस पासुन जिंतीपर्यंत भरपुर Cars chi रांग लावायचे), शेख सर(चष्मा कधी नाकावरती चढवुन रागावणारे तर कधी तोच चष्मा थोडीसा खाली घेत मिश्कील हसणारे), बर्वे सर(tuition साठी प्रवेश परिक्षा घेणारे), & भोकरे सर(वेळ प्रसंगी उशीरा आल्यास आपल्या दणकट पांढर्या खडुने माखलेल्या हाताने रट्टा देणारे).
होळकर पुलावरुन पोहचलोय येरवड्याला... आता office येणार :|
कुठे ? येरवडा jail शेजारी IT कामगार भरपुर येतात तिकडेच आहे.
तसे संजुबाबांना company द्यायाला सल्लु मियांपण येणार होते ऐन वेळेला कलटी मारली(same तशीच पैसे न भरता गेटटुला यायचे पक्के सांगुन उपस्थित न झालेल्यांसारखे, ज्याची त्याची वैयक्तिक कारणे असु शकतील, उगीच घोटळा नको विचारांचा).
बरं आता एक गोष्ट कॉमन झालीना
१. जेलमध्ये न आलेले - सल्लु मियां।
२. भोकरे सरांच्या शेजारी - सल्लु मियां।
३. आत्ताच WhatsApp वर comments कशे टाकणार विचारणारा - सल्लु मियां।
मी पोहचलो officeला, (तुमच्याकडे  access card नाही) तुम्ही जावा सल्लु मियां उर्फ सलिम बरोबर फिरायला...... हा हा हा।
इथुन पुढे माझी presenty कंसातच.
सलिम आत्तार उर्फ सल्लु मियां तसा मी बेताचाच विद्यार्थी (हुशार होताना राव पण करणार काय अंगात अवली किडे फार :P )
रहायला शाळेच्या जवळ पण कामे नेहमी शाळेतुन पळायची. माझ्या घराशेजारुन जाताना हळुच घराच्या मागच्या खिडकीतुन "सल्या, चलरे" म्हणणारे मित्र.(अर्थात माझीही हाक असायचीच)
शिकवणी शेजारी असुनपण कधी कधी घरी कपड्यांवरचे हातासे ठसे बघुन शेजारी शिकवणीला जाताना उशीर का झाला म्हणुन पुन्हा फटके खाउन कपडे स्वच्छ झालेला मी सलिम(मला वाटते मोदींनी याला स्वच्छ भारताचा Brand अंबेसिटार घोषित करण्यास काहीच हरकत नाही, आणि एक अतिमहत्वाचा मुद्दा सगळे detergent powder, soap वाले याच्यावरती त्यांचा कपडे साफ करण्याचा business डुबविल्याबद्दल दावा करतील की काय ही भीती आहेहो!)
मेन मुद्दयाकडे वळुयात.....
मला सगळ्यात आधी WhatsApp group form झाल्याची बातमी मिळाली ती चिन्याकडुन(नाव: सचिन, पण हा आपल्या गावात कसे हा नेहमी प्रश्न पडलेला.. क्रमश: तुमची ओळख होईलच)
आता WhatsApp group म्हंटल्यावर भरपुर message forwarding हा एक समज। पण आख्या जन्मात जेवढे पेपरमध्ये answers लिहीले नसतील तेवढे टाईप करावे लागते या ग्रुपमध्ये. (मला वाटते online पेक्षा कागदावरती लिहुन मेसेजींग केले असते तर सुंदर अक्षर असणारे विद्यार्थी झालो असतो अन शाळेत हाच विषय add करण्यास permission मागितली असती)
आता ओघानेच गेटटुचा मुद्दाही कळाला, पण येवढ्या वर्षांनी कसे काय? कुठे? असे प्रश्न आले. उत्तरं कुठे मिळणार तर शाळेजवळील renovation झालेल्या बेकरी मध्ये (गावातील अर्ध्या पालकांच्या खिशातील ₹-पैसे इकडे गल्यात जमा झालेले असतात).
साईनाथ बेकरी हा गावात राहण्यांचा famous कट्टा, इथुन news पक्की असल्याची कळताच आनंद झाला इतक्या वर्षांनी भेटणार सगळे. मी येणार असल्याचे confirm केले. माझा already plan होता तेव्हाच सोलापुरला जाण्याचा पण ते काम postpone होऊ शकत असल्याने माझा येण्याचा अडसर दुर झाला.
(साईच्या कृपेने गेटटुची कथा ऐकुन आणि शालेय मित्र-मैत्रीणींना भेटण्याची ईच्छा असलेल्या सलिमला योग्यते मार्गदर्शन दिले)
एक मात्र गोष्ट चांगली झाली माझ्यासोबत अब्बांनी फटके दिले पण त्यामुळेच माझी गाडी track वर राहीली आणी तुमच्याशी भेटु पण शकलो.
Thank you अब्बा.
गेटटु चा माझा अनुभव सांगायचे झाल्यास येवढा Freeness मला न कॉलेजवाल्या गेटटुला जाणवला न office partyला. इथली energyच वेगळी होती.
आणखी एक गोष्ट कळकळीनी सांगाविशी वाटते- योगेश माझ्यासारखाच बेताचा विद्यार्थी पण चिकाटी व जिद्दीने जे त्याने achieve केले त्यासाठी hats off to him.
योगेश ला माझ्यातर्फे UPSC च्या साठी best luck!
आणि गेटटु arrange केल्याबद्दल धन्यवाद!!!
काय झाली चक्कर मारुन सल्या उर्फ सल्लु मियां उर्फ सलिम सोबत???
अरे काय हे किती messages WhatsApp वर...
शिवाजीच्या मोबाईलची screen फोडुन येतील messages बाहेर.
पण किस्सा क्र. २ च्या प्रश्नाचे अजुनपण उत्तर नाही मिळाले का?
उत्तरं पाहीजे वाट पहा.... पुढच्या किस्स्यात भेटण्याची.         
                                                                                      >>>> MHS किस्सा - 4 :

11 comments:

  1. Replies
    1. Ha ha ha change in words pan bhavna tuzi tich.... Porano bhavnebaddav vichru naka.... Mala feeling mhanayache aahe

      Delete
  2. Abhya lay bhari june siwas athawale salyache

    ReplyDelete
  3. Sahich...Salim and Abhijeet nice writeup

    ReplyDelete
  4. झक्कास रे भावा...मस्त सल्लू मियाँ जोरदार...

    ReplyDelete
  5. तुझ्या प्रश्नाचे उत्तर में बी विव्या जाड्या असू शकते..

    ReplyDelete
  6. Abhi salim really nice one ....

    ReplyDelete
  7. AbhiJEET mast .............keep this going............
    Salim great.........

    ReplyDelete