Labels

Friend (11) mudhoji (11) phaltan (11) reunion (11) school (11)

Wednesday, October 28, 2015

MHS किस्सा - कालची शाळा आजची आठवण

आमचा पहिली ते चौथी हा प्रवास तसा निवांत होता. पण एखाद्याची शाळा घेणं म्हणजे नेमकं काय हे मात्र पाचवीला कळल .तसं बघायला गेलं तर फ़ारसं काही बदललं नव्हतं..पण एक महत्त्वाची गोष्ट मात्र बदलली होती. आजवर सगळ्या विषयांसाठी एकच शिक्षक अशी साधी सोप्पी सवय होती. पण इथे तर प्रत्येक विषयासाठी वेगवेगळे शिक्षक होते.
आता तर माझ्यासोबत विषयांचीही काही खैर नव्हती. भाषा, गणित, विज्ञान, इतिहास आणि भुगोल ह्या पांडवामध्ये आता "इंग्रजी" नावाच्या अजुन एका भांवडाची भर पडली होती. "शिकणारा एक और शिकवणारे सहा ... बहुत नाइंसाफ़ी है रे" अश्या असामाईक समीकरणाचा प्रश्न गब्बरला बहुदा सर्वप्रथम पाचवीलाच पडला असणार .. प्रत्येक विषय आता स्वत:चा मोठेपणा पुढे पुढे करु पहात असताना मी मात्र वर्गात एक एक बेंच मागे सरकत होतो ..
बेंचवरुन आठवल .. शाळेत सगळ्यात जास्त कुठल्या गोष्टीला गॆल्मर असेल तर ते म्हणजे शेवट्च्या बेंचला ..ह्या बेंचची गोष्टच वेगळी होती. तशी वर्गातली पुढची बाके ह्याच्या वाटेला सहसा कधी जात नसत. पुढची बाके अभ्यासात हुशार, तर ही दुनियादारीत. पुढची बाके एक्कलकोंडी, तर ही सदा गर्दीचा सेंटरपोंईट, पुढची बाके टिचररुममध्ये फ़ेमस, तर हा टिचररुमचा चर्चेचा विषय. पुढच्या बाकांवर शिक्षकांचे विषेश लक्ष्य, तर ह्याच्यावर बारीक नजर पुढची बाके आपल्या अक्कल हुशारीने ह्याच्यांकडे जाणूनबुजून जरी दुर्लक्ष्य करत असले तरी त्या बिचार्‍यानां माहित नव्हते की त्यांची हुशारीचे कौतुक ह्यांच्या शर्यतीत भाग न घेण्याच्या आळशीपणावर अवलबूंन होते. पण हे सारे बेंच कसेही असले तरी त्यावेळी ते त्यावर बसणार्याची प्राईव्हेट प्रोर्प्रर्टी होते. बरं ही एव्हढी प्रोर्प्रर्टी त्यावेळी नुसती त्यावर करकटकने आपलं नाव कोरुन आपल्या नावावर करता येत होती.
खरचं किती सोप्प होतं आयुष्य तेव्हा ... जस जस शाळेचे वय वाढु लागलं तसं तसं गणिताची आकडेमोड हातापायांच्या बोटांत मावेनाशी झाली. विज्ञान स्वत:सोबत माझ्यावरही वेगवेगळे प्रयोग करत होता. इतिहासातली सनावळ ही भुतावळीसारखी मानेवर बसली
होती, भुगोल स्व:ताचा देश सोडुन एखाद्या N.R.I सारखा इतर देशांचे गोडवे गाण्यात धन्यता मानु लागला होता. नागरीकशास्त्राने आपल्याला आपल्या आकारमानामुळे कुणीच भाव देत नसल्याचे लक्ष्यात येताच त्यानेही आता अर्थशास्त्राला सोबतीला घेउन आम्हाला जेरीला आणण्याचा जणू विडा उचलला होता.
पण आम्हीही आमच्या कुवतीनुसार ह्या सगळ्या स्वार्‍यानां मोठ्या हिमतीने तोंड देत होतो.
सातवीनंतर शाळा थोडी बिनदास्त बनू लागली. बघता बघता शाळा मॆच्युअर्ड होउ लागली. भाषा, गणित, विज्ञान आणि इतर सारे विषय आता आपले संवगडी वाटु लागले होते. तर परिक्षा एक खोडकर मैत्रीण...
दहावी नावाच्या शेवटच्या वर्षाचा घरच्यांनी दाखवलेला बागुलबुआही आम्हाला कधी घाबरवू शकला नाही कारण शाळेतल्या शिक्षकरुपी देवापुढे त्यांची मजल नाही ह्याची आम्हाला खात्री होती...
सगळं कसं अगदी व्यवस्थीत चालु असताना नेमका तो दिवस आला .... "सॆंड-ऒफ़" इतके दिवस ह्या दिवसाच आकर्षण होते ..... आणि आज तो नेमका उजाडला .. मुली पंजाबी सूट आणि साड्यांमध्ये आल्या होत्या.
इतके दिवस अजिबात लक्ष्यात न आलेली गोष्ट म्हणजे खरंच आजवर आमच्या आजुबाजूला वावरणार्‍या ज्यांना आम्ही साळकाया- म्हाळकाया म्हणून चिडवायचो. त्या आज खंरच मोठ्या झाल्या होत्या.
मुख्याध्यापकांचे भाषण झाले, नंतर शिक्षकांचेही चार शब्द सांगुन झाले, आपण आणि आपली शाळा ह्याच्यावर पुढल्या बाकांचे धडाधड एक दोन निबंधही बोलुन झाले. नंतर एक छोटीशी पार्टी ..
वेळ संपल्याची जाणिव झाली ती मुलींच्या रडण्याने. इतक्यावेळच्या जुही चावला आणि करिष्मा कपूर अचानक आशा काळे व अलका कुबल वाटु लागल्या.
आमची मात्र हसता हसता पुरेवाट झाली. आजचा दिवस भरला आता उद्या आज शाळा सुटली..." अस सांगणारी घंटा नाही ..
लगेच मागे वळुन पाहीलं आणि नेमका शाळेत येतानाचा पहिला दिवस आठवला. गेटवर मी अगदी तसाच उभा होतो रडवेल्या चेहर्याने मागे वळुन पहाणारा फ़क्त आता दिशा बदलली होती.
पहिल्या दिवशी शाळेत येताना आई जशी धुसर होत गेलेली, तशी आज शाळाही हळुहळु डोळ्यात धुसर होत होती.
हे दोन्ही दिवस आजही माझ्यासाठी अगदी तस्सेच होते फ़क्त त्यादिवशी आईने हात सोडला तेव्हा मी तिथे एकटा होतो पण आज जेव्हा शाळेचा हात सुटला तेव्हा माझ्यासोबत माझा आत्मविश्वास होता, डोळ्यात उद्याची स्वप्ने होती , कुठल्याही परिस्थितीत मला सावरणारी संस्काराची शिदोरी होती
आणी मनांत कधीही न पुसल्या जाणाऱ्या  आठवणी होत्या ...
आज ही शाळेच्या गेटवरुन शाळेकडे पहाताना पापण्यांच्या कडा नकळत ओलावतात. तिला पहाताना उर भरुन येतो.......
तर मग जमणार काय गेट-टु ला?

Thursday, September 10, 2015

MHS किस्सा 6 : काकु :)

शुक्रवारचा दिवस होता, वेळ साधारण सकाळी 11 ची, मी clinic मध्येच बसले होते. 
अल्पनाचा message आला, "मधुराने शाळेचा  group  बनवला आहे. तुला join व्हायचे का?" 
मी हो बोलले व  join झाले. Group चे नाव होते 'Mudhoji High School 2000 Batch'. 
मी त्याला 'School Days' नाव दिले. सर्वांना खुप आवडले. 
Almost १५ वर्षांनी बोलत होते सगळे. Group छान जमला. शाळेत कामापुरते बोलणार्या सर्वजणी जिवाभावाच्या मैत्रिणी झालो आणि धमाल सुरू झाली.
अशातच ७-८ महिने गेले व हर्षदाने group वर message टाकला - "मुला-मुलींचा एक group  होत आहे, कोण कोण interested आहे का ?" 
At the same time योगेशने FB वर message केला - "काकू तुझा mobile no. दे"  
नंतर कोणी add केले ते आठवत नाही. पण मी MHS ची group member झाले.
सगळे नवीनच वाटत होते.
काही नावाने आठवत होते, काही चेहर् याने; तर काही लोक अजूनही आठवत नाहीत शाळेत बघितल्यासारखे.
Being a school girl; I was very shy. त्यामुळे मी कोणाला माहित असेल हि शंकाच.
पण group एवढा active होता की सर्वांची नव्याने मैत्री झाली. 
त्याचमुळे Get Together ला सर्वांना १५ वर्षांनी भेटून सुद्धा असे वाटले की सगळे रोजच भेटतो आपण. आणि तिथे जो अद्भुत सोहळा झाला त्यासाठी तर माझ्याकडे शब्दच नाहीत. ... I am speechless. ....All enjoyed a lot... hall, food, cake, return gift, everything was perfect. ..... And most enjoyable was gappa & laughter..... All credit go's to management team.... lots of thanks to team....!

Saturday, August 8, 2015

Reminiscences by PK

आठवणी काही जपून ठेवलेल्या, काही आपोआप स्मरणात राहिलेल्या, काही मनाला स्पर्श करून गेलेल्या, काही हसणार्या, तर काही दुखावणार्या..........            काही  गवसल्या  नंतर काही हरवल्याची जाणीव करून देशाच्या , आशा या आठवणी. ... मित्रांनो,  म्हणूनच तुमच्या सोबत जगलेल्या काही ठळक / धुसर आठवणींचा कोलाज मांडावा असं वाटलं.....                              बाजारे शाळा - वर्ग 4थी ब 4 थी ब चा वर्ग शेवटून दुसरा अंधारात होता, 4 थी अ चा मात्र अगदी पर्यात होता. त्या वर्गाकडे जायची त्यावेळी माझी कधी हिंमतच होत नव्हती.(अ तुकडी मधिल गोर्यां गोमट्या चेहर् यांची भितीच कारणीभूत असेल बहुधा )             बाजारे शाळेनंतर मुधोजी हायस्कूल ला भरती झाली. आमची  रवानगी 5 वी अ मध्ये झाली. तो पहिला दिवस अजूनही थोडाफार आठवतो. सर्वांना तुकडी निहाय रांगेत उभे केले होते. पतंगे मॅडम आणि जावळे सर ( लिज्जत पापड ची जाहिरात लागली की सर अजूनही आठवुन जातात ) काहीतरी instructions देत होते.             वर्गात प्रवेश केला. ....... ( सर्वात safe जागा म्हणजे मधल्या रांगेतील बाक, फार पुढे ही नाही आणि फार मागे पण नाही ) गणिताला पारशी  मॅडम , इंग्रजी / विज्ञाना ला जोशी मॅडम.  ( 4 थी पर्यंत शेंडे बाई, बेडकीहाळ बाई , कदम बाई, या सार्यांना बाई असे संबोधत होतो, 5 वी नंतर शिक्षिकेला मॅडम म्हणायला सुरूवात केली असावी )            हळूहळू वर्ग मित्रांबरोबर मैत्री घट्ट व्हायला लागली. शिकवण्या पण जवळपास सर्वांच्या काही ठराविक ठिकाणी च होत्या.            5 वी ते 10 वी मुधोजीच्या खुप सार् या आठवणी अजूनही लक्षात आहेत. भोकरे सरांनी पाठ करून घेतलेले  I-go/You-go , शेख सरांची गणित व विज्ञान  शिकवण्याची पद्धत, चांदवडकर मॅडम ची करडी शिस्त, नेरकर - हळबे सरांची संगितावरची आस्था, मदने सरांचे फळ्यावरचे सुवाच्च अक्षर, उंडे सरांचा रूद्रावतार, NCC मधले दिवस, धुमाळ सुरांचे extra classes , R.K. Deshpande सरांचे ऐका हातात नैपकीन घेऊन पुस्तक सावरणे, P.T. च्या तासाला केशरी रंगाच्या हवा नसलेल्या फुटबॉल मागे धावणे, विमानतळावर, चिटुं, देवदत्त, वादे, राठोड, किरण जाधव, शिवा, प्रित्या, योगेश निकम, सागर निंबाळकर या सर्वांबरोबर खेळलेल्या cricket matches, काही घराच्या खिडक्यांच्या फोडलेल्या काचा......              
 10 वी ला बर्वे सरांचा class  ( सर फार शिस्तीचे, इतके की त्यांचा दुधवाला सुद्धा घड्याळाचा काटा चुकवत नसे.) आणि खुप सारे लाल शेरे असलेली माझी वही.             

 पुढे 11 वी 12 वी ला Y.C.J.C. ला admission,  पण सालं तिथे करमतच नव्हतं, सर्व मित्र मुधोजीला च होते, classes एकच असल्यामुळे अंतर वाढले नाही.......            
शेख सरांची energy, त्याचं dedication, चष्मा खाली घेऊन बघणे, केसकर सरांची physics शिकवण्याची हातोटी, शिंदे सरांनी maths  साठी करून घेतलेली मेहनत..                बोर्डाच्या परिक्षा  ( अदिती कुलकर्णी board exam ला पुढच्या बाकावर असायची - एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ ) नंतरची खुप मोठी सुट्टी, results चे आलेले tension ........सगळ अगदी व्यवस्थित आठवत. ...                 Results नंतर सगळे आपापल्या मार्गाला लागले..... पुलाखालुन बरच पाणी वाहुन गेलं होतं.....  आणि अचानक उजाडला 26 जुलै चा दिवस.....

अशा बर्याचशा आठवणी मनात ठाण मां�डुन बसलेल्या आहेत . ...

जाता जाता  कुठेतरी वाचलेला एक शेर

"किनारो पर सागर के खजाने नही आते |   
फिर जिवन में दोस्त पुराने नही आते |  
 जि लो इन पलों को हसके जनाब  फिर लौटकर दोस्ती के जमाने नही आते | "                                              P.K.

Monday, August 3, 2015

MHS किस्सा - 7 : सुन

मागील blog मध्ये शेवटचे शब्द लिहिले होते - "coming सुन"
काय विचार भरकट होते तुमच्या मनामध्ये ?
कोण सून?
कुठल्या मुली / मैत्रिणीबद्दल असावा ?

सगळे सांगतो; पण थोडा दम धरा.
तश्या मुधोजी हाय स्कुल मध्ये मुलींचा count भरपूर. मुले पण भाग्यवान म्हणायची.
असोत आता शाळेतून बाहेर पडल्यावर कोण किती मोठे होते हे ज्याच्या त्याच्या हाती आणि घेतलेल्या परिश्रम यांमुळे. मुली म्हटले कि परिश्रम फार - अभ्यास करणे हेतर आलेच हो पण make up ही गोष्ट ओघानेच आली.
मेक-अप करायचे म्हणाले कि किती परिश्रम कुठल्या डबीतून कितीप्रमाणात कुठली powder किंवा solution घ्यायचे आणि कसे लावायचे  यांचे ज्ञान हे एकदम न सांगता बाळकडू असल्यासारखे.

असोत यांनी जर या गोष्टी नाही केल्यातर अर्धे जग बेकार होऊन जाईल.
जर इतकी स्तुती सुमने उधळली मुलींवर तर एकतर देशाचे growth rate जबरदस्त आणि आर्थिक मंदी येण्याचे संबध नाही. बहुतेक ग्रीक वासी हीच गोष्ट करायची चुकले आणि आता त्यांची सरकार सोने विकून आर्थिक व्यवस्था टिकवुन ठेवायचे प्रयत्न करते आहे आणि आम्ही भारतीय ते खरेदी करण्याचे :P
सध्याचे HOT topic - What is the current Gold rate?

बेकारीवरून आठवले साइच्या बेकारीची आठवण आली ना मागील blog चे शेवट - coming सुन.
आता या शाळकरी मैत्रिणी विवाहित होणार आणि नवीन नात्यांची सुरवात = सून.
सून बनायचे म्हणजे तारेवरची कसरत, किती गोष्टी सांभाळाव्या लागतात त्यांचे त्यांनाच माहित.
खरेच त्यांची सुंदरता प्रशंसनीय आहेच पण हि नाती सांभाळण्याची ताकद हरप्रकारे हीपण वाखाणण्याजोगी असते.  Make up ची Powder ते घर सांभाळायची Power हा प्रवास कौतुकास्पद. अर्थात याच्याबद्दल घरच्यांना व घरच्या संस्कारांना मानले पाहीजे.
आता सुन म्हंटले की नवी नाती आली ती ओघानेच.
सुन, जाऊ, नणंद, वहिनी. या नात्यांचे व शब्दाचे उच्चार थोड्याबहुत फरकाने बदललतात, पण नाती तिच.

चला नाती गोती आपला विषय नाही या blogचा.
ज्या व्यकती बद्दल सांगायचे आहे ती व्यक्ती फारच संस्कारी.
मित्र-मैत्रीणींचा परिवार मोठा. माझी आणी या व्यकतीची tuning बर् यापैकी चांगली. शाळा कॉलेज पर्यंत केलेली चेष्टा म्हस्करी भरपुर. १२ वी engineering पर्यंत या व्यकती च्या touch मध्ये होतो पण ऩंतर फक्त मित्रांबरोबरील गप्पा मारताना आठवणी मध्ये.
आता धन्यवाद म्हणावा तर गेट-टु ला होकार देणार्या तुम्हा मित्रांना.
ही व्यक्ती डीग्री नंतर एकदम गायब, आता ह्या व्यक्तीला मिस्टर इंडीया म्हणावे की मिस इंडीया हे तुम्हीच ठरवा.
मला कसाबसा या व्यकतीचा contact मिळाला खरा पण ही व्यक्ती गेट-टु ला येईल की नाही ही शंकाच होती.
ह्या व्यक्तीशी झालेले संभाषण एेका म्हणजे कळेल ही व्क्ती कोण!
मी: हेलो तुम्ही ***** का?
ती: हो, आपण?
मी: अरे ते राहुद्यात तुम्ही नर्हे मध्ये रहाता का?
ती: हो.  आपण?
मी: तुम्हाला गाडी चालवायची कुणी शिकवली??? एवढ्या जोरात turn घेतात का? तुम्ही turn घेतल्यावर मागे कुणी हे पण तुम्हाला कळत नाही? नुकसान भरपाई सोडा पण एकदा गाडी थांबऊन विचारपुस तर करायची!!
(आता या व्यकती चे धाबे दणाणले असणार, कारण पुढच्या प्रश्नात आवाजाचा tone change)
ती: अहो नाही हो.... मी एवढ्या जोरात गाडी कधीच चालवीत नाही. मला नाही आठवत असे काही झाल्याचे.
मी: (थोडा आवाज वरचढ करुन) ओ मला काही वेड नाही लागले उगीच R.T.O. मधुन तुमचा नाव, पत्ता व address काढायला.
(Just imagine काय situation असेल त्या व्यक्तीची)
ती: अहो लागले आहे का कुणाला? कोण पडले आहे? काही जास्त खर्च आहे काय treatmentचा?
मी: हो, १००० रुपये लागतील!
ती: काय?
(मला वाटतय त्या व्यक्तीला जर कुणी फक्त १०००रु मागत असेल तर ५ रु वाला Feviquick च्या advertisementची आठवण आली असेल, पण ती व्यक्ती shock मध्ये जास्त असावी तीला काहीच आठवले नसणार :P )
मी: हो हजार रुपये लागतील, कळत नाही का एकदा सांगीतलेले.
ती: हो पण आपण कोण?
(मला हसु आवरणे फार जड जात होते, हसत हसत ह्या प्रश्नाचे उत्तर प्रश्नच असणार बरोबरना?)
मी: आवाज ओळखला नाही कारे....?
(आता सुन आणी कारे दोन शब्द जुळत नाहीत; कागं म्हणायला पाहीजे पण कारे १०००% टक्के बरोबर)
(वरती वापरलेले "ती:" हे shortcut आहे "ती व्यकती:" याचे)
इथुनपुढे थोडीशी BIPs ची भाषा!!!

आता ही व्यक्ती गेट-टु ला येईल हे पक्के झाले.
ही व्यक्ती आहे - वैभव निंबाळकर!
Initials: वै.नि.
वैनि हा गावाकडे वहीनी या शब्दाचा अपभ्रंश!!!
वहीनी म्हणजे कुणाचीतरी सुन होयना!
पण इथे वैनि सुन नसुन जावई आहे.

Hence proved - मराठी भाषा वळवेल तशी वळते.


आता यात suspence कुठे आहे आहे पुढच्या blog चे...?
Blog चे sequence नंबर नाही बघीतला वाटते....


वाचत रहा....!
 

Friday, July 31, 2015

MHS किस्सा - 5 : मित्राचे पत्र - पत्रात मित्र

तुम्हाला आठवते आहे का - तुम्हाला शेवटचा email किंवा पत्र कधी आले होते ?
नाही आठवत ना पण मलाही नाही. शाळेत पत्रालेखन केले पण त्यानंतर नाही.

आता पत्रे येतात ती… Bank, Insurance, किंवा कुठल्यातरी company ची।
       पण आपल्यांची पत्रे कशी असतात ते विसरलोच. आधी email किंवा SMS तरी पाठवायचे एकमेकांना पण आता तेही नाही.

आता याच गेट-टु मुळे मला एक पत्र आले बघातर कुणाचे आहे ते…


* ता. क. : आज मला नाही वाटत की पत्रात कुठे जागा मिळेल कंसातून डोकवायला, बघतो प्रयत्न करून *

प्रिय अभिजीत,

माझ्याकडे मराठी font नाही आणी मला इतक्या fast मराठीतुन type करताही येत नाही. 
So please consider it.
तुला एक किस्सा सांगायचा आहे - आपल्या गेत्टू विषयी.


तारीख 28/05/15 रात्री 9.45 ची.मी पुण्यावरून फलटणला जात होतो, गाडी चालवतच होतो आणी तेवढ्यात फोन वाजला.

बघतोतर Number निलेशचा. 
(निलेश भोईटे : या व्यक्तिमत्व बद्दल सांगायचे तर group वर आणि सामोरुन सुद्धा कमी बोलणारा, याची खूण म्हणजे मधूनच स्मितहास्य देणारा)

आमचे संभाषण  झाले :
मी: - बोल अण्णा !!
निलेश: - तुझा फोन का बंद आहे दोन दिवसापासून ? 
(hi -hello ची भानगड मैत्रीत सापडणे कठीणच वाटते)
मी: - मग आपण कशावर बोलतोय ? 
(आता याची कुठली रास म्हणायची काय माहित ? बिचारा पलीकडून प्रश्न विचारतोय आणि उत्तर न देता - उलटा प्रश्न विचारला. )
निलेश: - तस नाही - WhatsApp  बंद आहे का ? उत्तर कोण देणारबे!
मी: - लग्नात व्यस्त होतो त्यामुळे फक्त बद ठेवला होता.  स्मार्टफोनच्या  battery ची बोंबच आहेना बाबा। काही विशेष? बोल की…

निलेश: - अरे  योगेश ने Group बनवला आहे वर्गातल्या मित्र-मैत्रीणांचा WhatsApp वर, तुलाही Add केले आहे त्याने. 
(इथे निलेश म्हणा किंवा याने म्हणा; मला नाही  वाटत एवढे स्पष्ट आणि पूर्ण नाव घेतले असेल योगेश चे)
मी: -. बघतो घरी जाऊन -रस्त्यात आहे…. 

पुढचे बोलणार तेवढ्यात फोनच्या battery ने दगा दिला :(
आता घरी जाई पर्यंत काही कळणार नव्हते मला.

घरी गेल्यावर पहिला phone charging ला लावला आणि fresh होऊन जेवायला बसताना net on केला. 
(आता इथुनपुढे ह्याची मंडळी जोश मध्ये आल्याशिवाय राहणार नव्हती - जेवा कि निवांत झाले चालू फोन वरती. असा पक्का काहीतरी dialogue पडला असणार

आता mobile चे जेवण (charging) झाल्यामुळे तोपण जोमात आला होता, पहिले एक - दोन आवाज आले व्यवस्थित पण नंतर अर्धी ringtone वाजून नुसती light दिसत होती, बघतोय तर १२७८ messages.
(मला वाटतंय थापा टाकतोय, आत त्याच्या फोनची history कोण check करणार आहे)

बायको म्हणाली घरातल्या सगळ्यांचे messages तुमच्या mobile वर divert करून घेतले का?
इतके messages आणि नवीन group बद्दल उत्सुकता यामुळे रात्री काही झोप नाही लागली मला. 
मग सगळी रात्र messages वाचण्यात आणि ज्यांचे number माझ्याकडे नव्हते त्यांचे profile photo बघुन contact save करण्यात गेली. आता अजुन असे बरेचजण असे होते ज्यांची ओळख पटली नव्हती.

सकाळी कुणाचे message नव्हते मला वाटले नवीन group असल्यामुळे आता तिसऱ्या दिवशी पुर उतरला असेल. आणि आलाना राव तेवढ्यात good morning चा message. 
(पहिले तर याला घाबरल्यासारखे झाले असेल डोक्यात विचार येताच mobile मध्ये message आलाना)
 मी good morning चा message टाकुन reply केला आणि झाली पुन्हा messages ला सुरवात. 
पहिला mobile charging ला लावला.
(याला म्हणतात हात दाखवुन अवलक्षण - मलातर आता हसून हसून डोळ्यात पाणी आले बाबा या किस्स्याने)

त्यानंतर योगेशचा phone आला - कुठे आहे म्हणल्यावर ? 
नेहमीचे बेकारीवर आहे असे सांगितलं मग येतो म्हणाला निवांत बोलायला संद्याकाळी. 
(आता मला सांगा नवीन group त्यातुन एवढे messages आणि योगेश चा phone…. तुम्हाला तरी खर वाटते आहे का की हे संभाषण बिना BIP च्या पूर्ण झाले असेल)

संद्याकाळी योगेश आल्यावर सगळ्या गोष्टी clear झाल्या. 
आपल्या शाळेच्या group चा गेत्टू करायचा म्हणत होता.
मी लगेच होकार दिला - का-कुठे-कधी असले प्रश्न विचार मनात आलाच नाही. कारण इतक्या वर्षांनी आपण कुणा कुणाला भेटणार त्याचा विचार डोक्यात येत होता. 
शाळेच्या जवळ असल्यामुळे बरेचजण यायचे लहान असताना आणि तशीपण आपली जागा गावाच्यामाध्येच कुणीनाकुणी भेटत असतेच किंवा दिसते. 
(आता इथे भेटला आम्हाला बिर्याणी शिजवणार - एकट्याने थोडी बनते बिर्याणी चांगली - आणि एकटी खाण्यात पण मज्जा नाही, हा आता पुढे जाऊन बनला फलटण चा monitor)

आणि आता regular chatting सुरु झाली WhatsApp वर आणि नवीन ओळखी होत गेल्या. एके दिवशी ठराव मान्य झाला - २६ जुलै ला शिक्का मारला. (आणि एकमतानी विजयी झाले - शक्यच नव्हते ७० लोक म्हंटल्यावर)

पण शेवटी २६ जुलैला तुम्हाच्याशी सामोरासामोर भेट झाली. 
मला यायला थोडा उशीरच झाला पण तुमच्या सर्वांचे degree आणि job details सांगताना आलो होतो. पण सगळे एकूण चांगले वाटले. 

सलीम त्यावेळेस कुठल्यातरी वर्षाचे calculations सांगत होता.  :P 

उशिरा आल्यामुळे माझा intro राहिलाच, तशी त्याची गरज आहे का?
नाव : साईप्रसाद फुले
शिक्षण : १० पर्यंत - मुधोजी; ११-१२ - Y.C.; Diploma in Bakery & Confectionery from Maharashtra Institute of Hotel Management & Catering Technology, Pune. 

ज्यांच्याशी शाळेत कधी बोललो नाही त्यांच्याशी गप्पा रंगल्या - सगळ्यांनी आपुलकीने चौकशी केली…. 
खरच खूपच छान गेले ४-५ तास रोजच्यापेक्षा कितीतरी वेगळे… 
मस्त। एकदम refreshing वाटले. 
खरच खूप सुंदर झाला प्रोग्राम आपल्या गेट-टु चा… !

जे सुचले ते लिहून पाठवतोय हवे तेव्हा तक blog वर. :)

- साई. 




छान वाटलेना बऱ्याच दिवसांनी email किंवा पत्र वाचून. 
वाटणारच… आपल्या मित्राचे आहेना. 

असेच भेटत राहा। पत्र पाठवत राहा …. 

अरे पुन्हा विसरलो… आलाय काय प्रश्नांचे उत्तर… 


……………………………… वाचाल तर वाचाल …… काय पुढील ब्लॉग ;)



                                                                           >>>> MHS किस्सा - 7: Coming सून

Thursday, July 30, 2015

MHS किस्सा - 4 : गुरु महिमा

Hmmmm........
तुम्ही माझ्यासंगे office पर्यंत आलात, पुन्हा सोडायची जवाबदारी माझी!
सलिम बरोबर चक्कर मारलीत, त्याचे म्हणणे होते :
"अब्बांचे फटके तर खायचोच घरी, पण school-ground वर खो-खोसाठी खलाटे सरांचेही फटके खायचो. पण याचमुळे वर्षातुन एकदाका होईना सगळे students व शिक्षक आमच्यासाठी टाळ्या वाजवायचे, कारण zonal व district ला आम्ही जिंकुन यायचो. हे तर झालेच पण वर्गातसुध्दा home work complete नसल्यामुळे तिथेही... फटकेच. अशाप्रकारे घरी, शाळेत व ground वर त्रिवार फटके खात आयुष्य फाटके न होता, engineer झालो. अब्बा व teachers ना प्रणाम व आभार आपल्याला track वर ठेवल्याबद्दल!!!"
(अरे या सल्या चे मला एक कळत नाही बांगलादेशी आहेकी काय? नुसता खा खा खातोय आणि तेपण काय तर मार, असुदेत पण तो आपला मित्र आहेना भावा)
मी तर पोहचलो, येरवडा-रेंज हिल्स-university-चर्तुश्रींगी-Symbi करत कमला नेहरु पार्क पर्यंत.
इथे मस्त मंदिर आहे - श्रीदत्त महाराजांचे. सुंदर      अक्षरात लिहीले आहे:
गुरूब्रम्हा गुरुविष्णु:
गुरूदेवो महेश्वरा
गुरु साक्षात परब्रम्ह:
तस्मैश्री गुरूवे नमः।।
सर्वांनाच गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा .
आता तुम्हाला इकडेच drop करुन मी निघतो, रस्ता लहान आहे मागचे गाडीवाले Horn वाजवत आहेत.
भिउ नकोस मी "कंसात" आहे, चला चालुद्यात तुमचे.
आज गुरूपौर्णिमेचा मुहुर्त म्हंटल्यावर तुम्हाला सर्व गुरुदनांची आठवण करुन द्यायला हवी, पण करुन कोण देणार मी तर निघालोय, तुम्ही स्वतःच ओळख करुन त्या व्यक्तीशी.
नमस्कार,
मी होते गेटटुला थोडीशी silent mode मध्ये. मला तुम्ही "भांडकुदळ" म्हणुन ओळखायचा.(आता ही सु की कु प्रसिध्दी तुम्हाला जास्त माहीत) हा बदल तुम्ही स्वतःच ओळखलात ना?
काय ओळखलेत का? मी गौरी फुटाणे। 
(पावसाचा माैसम आहे मस्त मसालेवाले शेंगदाणे घेतल गाड्यावरुन, अरेच्चा इथे फुटाणे पण आहेत. मराठी भाषाही आपली वळवाल तशी... :D मी वळतो.)
काल सलिम बरोबर चक्कर मारलीत तेव्हा शिक्षकांच्या आठवणी ताज्या झाल्या.
आता सुरुवात कुणापासुन करायची हा प्रश्न? विषयाला धरुन बोललेकी सर्व प्रश्न सुटतात.
गणित विषयाने सुरुवात करुयात आपण.(मी सांगितलेना भिउ नकोस मी कंसात आहे. इथे कुठलेही सर तुम्हाला गणित सोडवायला देणार नाहीत याची guarantee माझी. प्लिज continue...) तर मी बहुतेक सर्व सरांना का खटकायचे तेच कळायचे नाही.
मग ते वादे सर असोत की अडसुळ सर किंवा अगदी उंडे सर सर्वांची बोलणी खायचे. (बोंबला सल्या खायचा मार आणी ही खाते बोलणी,देवा कसली पोरं भरली आहेत या शाळेत) अडसुळ सर मला व अनुराधा तावरेला उभे करुन भरपुर झापायचे, सुरुवात ठरलेली- "तुम्ही स्वतःला फार शहाणे समजता.... इ.". Sorry नितिन एक गोष्ट सांगाविशी वाटते- अडसुळ सर आम्हालाना 'राज कपुर' सारखे दिसायचे.
दहावी-अ च्या वर्गाला होती gallary, अगदी stage च्या शेजारील LAB च्या वरचा वर्ग. इथेच Lunch break मधील डब्बा संपवुन गँलरीत आम्ही उभ्या असताना कुठल्यातरी विनोदावरुन आम्ही हसत होतो आणी तेवढ्यात शाळेच्या गेटमधुन आत येत असताना उंडे सरांनी आम्हाला बघीतले. (आता इथे आपण इतिहास काळाची गोष्ट करत असलो तरी कुठल्या ज्योतीषाची गरज नाही काय झाले असेल ते सांगायला) गणिताच्या तासाला आम्हाला उभे करुन ५-१० दहा मिनीटे तोंड सुख घेतले आणी आमचे oppositionवाले जे benchवर बसलेले होते त्यांची
मनातल्या मनात खो खो हसुन काय अवस्था झाली असेल ते तुम्हालाच ठाऊक. पुढील १-२ आठवडे तरी त्या शापीत gallery चा उंबरा ओलांडणे होणार नाही हे नक्की.
आता गणिताचाच विषय चालु आहे तर सांगते मला प्रकाश शिंदे व भोईटे सरांनी फार मदत केली. प्रत्येक प्रसंगी भरपुर मदत मिळाली, अनंत उपकार आहेत माझ्यावरती.
एक किस्सा - शिंदे सरांच्या tuition चा. एकेदा संध्याकाळी भरपुर जोराचा पाऊस होता; मी, गायत्री आणी चव्हाण आम्ही तिघीच क्लासला बाकी कुठल्याच मुली आल्या नव्हत्या फक्त मुलेच. त्यात पुन्हा light गेली, आम्हाला फार भिती वाटली. पण कुणी आमहाला त्रास दिला नाही की चिडवलेसुद्धा नाही.(आता माझी सटकली - फलटणची पोर म्हणजे काय टुक्कार category वाटली काय? दंगा-मस्ती करणारी category आम्हा मित्रांची पण असले विचार म्हणजे जास्तचं होतयना राव! त्या दिवशी बोलुन दाखविले असते तर आकाश व क्लासच्या बाहेर अशा विजा चमकल्याकी जन्मात लक्षात राहीली असती पावसाळी संध्याकाळची tuition ची तुमची attendance. प्लिज continue...)
काही जणांनी भुगोल हा विषय घेतला होता ११-१२ वीला. त्याचे वर्ग चालायचे drawing class मध्ये, निंबाळकर madamचे. आता या वर्गाला २ दरवाजे आणी मजल्याला जिने दोन. एका जिन्यातुन बाई वरती येऊ लागल्याकी दुसर्या जिन्यातुन विद्यार्थी पसार... आठवते का? (होना भुगोलाचे lecture attend करायचे म्हंटलेकी जीव भगुल्यात पडायचा)
मराठी विषय कसा विसरेन मी - आपली बोली भाषा म्हणुन नव्हे तर चांदवडकर बाई व शाळेचा uniform-साडी(पोरांनो मराठीचा विषय चालु आहे तिकडे लक्ष द्या बाकीचे विषय नकोत! मला नमुद करावेसे वाटतय मुलींनी सांगीतल्या प्रमाणे त्यावेळेस मी शेळपटच होतो. धन्यवाद मी वाचलो, प्लिज continue...) मराठीच्या लेक्चर आहे म्हंटलकी आमची त्रेधातिरपीट व्हायची.
आता धावती ओळख Physics च्या class ला. "Rigid body... Rigid body... Substance..." ऐकुन जाम bore व्हायचे पण बोराटे सरांच्या चेहरा व शिकवण्याची चिकाटी बघुन विषयात कधी कमी marks पडतील असे वाटले नाही.(Hats off for teaching us)
सगळ्या teachers ची list व आठवणी भरपुर आहे पण blog भरपुर मोठा होईल व तुम्ही पळाल, म्हणुन पुन्हा कधीतरी.
Last but not least ज्यांच्यामुळे हा blog पुर्ण होणार नाही ते आदरणीय शेवडे सर. घरच्यांची ओळख असल्यामुळे मला सरांचा बराच support मिळाला. त्यांनी तर मी दहावीला पास झाल्याचा result सांगुन स्वतःच पेढे दिले होते.
हे दिवस कसे फुलपाखरासारखे उडुन गेले ते कळलेपण नाहीत. फुलपाखराला पकडायचा प्रयत्न केलातर हाताला लागतो तो त्याचा रंगेबेरंगी रंग.... या आठवणींचा.
अजुनही बरेच काही आहे तुम्हा सर्वांनबद्दल सांगायला पण पुस्तक बनुन जाईल या सगळ्यांच्या आठवणींचा.
योगेश तर एक best Admin आहे तु या सर्वांचे bonding कायम ठेवायला मदत करशीलच ही अपेक्षा।
आता झालीका सर्व शाळेची व शिक्षकांची भेट.
गाैरीला special thanks मला सुट्टी दिल्याबद्दल की आज blog कुणाचा व काय लिहावे याच्याबद्दल.
पण अजुनपण मला एक गोष्ट खटकत आहे - तुम्हाला अजुन कसे नाही कळाले ती पृथ्वीच्या गोलाशी comparison असलेली व विद्यार्थी दशेत Flat पोट असलेली व्यक्ती कोण???
सांगतो पुढच्या किस्स्यात....!

                                                                                    >>>> MHS किस्सा -५